राष्ट्रीय सेवा योजना व तालुका विधी सेवा समिती द्वारे पटनाटयातून कायदेविषयक जनजागृती

 राष्ट्रीय सेवा योजना व तालुका विधी सेवा समिती द्वारे पटनाटयातून  कायदेविषयक जनजागृती

पिडीत व्यक्तीला कायद्याने दिलेल्या मोफत सहाय्यताबाबत सामान्य नागरिकांना पथनाटयातून जनजागृती करणे गरजेचे  : न्यायाधीश श्री. नदाफ

स्थानिक:  गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चांदूर बाजार येथील राष्ट्रीय सेवा योजना व तालुका विधी सेवा समिती चांदूरबाजार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पॅन इंडिया अवेअरनेस अँड आउटरिच प्रोग्राम अंतर्गत सर्व सामान्य नागरिकांना भारतीय साविधानाद्वारे दिलेले समान न्याय व कायद्याचे अधिकार माहित व्हावेत. तसेच समाजातील वाईट प्रथा, हिंसाचार, जातीय हिंसा व अत्याचार आणि महिला विरोधी अत्याचार कमी व्हावा याकरिता पिडीत व्यक्तीस समान न्याय व कायदेविषयक मोफत सहायता मिळत असून भारतीय संविधान ३९ क नुसार पथनाट्या द्वारे टोम्पे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनाच्या स्वयंसेवकांनी न्यायाधीश श्री. जी. एम नदाफ साहेब, न्यायाधीश श्री. जी बी. नंदागवळे साहेब, न्यायाधीश श्रीमती डी. के. साहू मॅडम यांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक श्री. नरेंद्र पेनदोर साहेब तसेच सरकारी वकील ऍड वानखडे बार अध्यक्ष ऍड धाकडे आणि सर्व पोलीस प्रशासनाच्या उपस्थित चांदूर बाजार येथील टोम्पे महाविद्यालयात व पोलीस स्टेशन समोर बसस्थानकाजवळ परिसरात सादर करून जनजागृती करण्यात आली.


पथनाट्याच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केलेत तदनंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून समतेचा व न्यायाचा संदेश देण्यात आला. प्रा. डॉ. मंगेश अडगोकर यांनी प्रस्तावनेतून पथनाट्या मागची भूमिका मांडलीत. पोलीस निरीक्षक श्री. पेनडोर यांनी भारतीय संविधानाने सामान्य नागरिकांना स्वातंत्र, समानता, बंधुता या आधारे न्याय, कायदा आणि सुव्यवस्था कश्या निर्माण केलीत याचे उदाहरण देवून स्वातंत्रोत्तर भारतातील नागरिकांना सामान न्याय देण्याचे काम न्यायदेवता व पोलीस प्रशासन करत असते असे मत व्यक्त केले. न्यायधीश श्री. नदाफ यांनी भारतीय संविधान निर्मित करत असतांना कुणाला उद्देशून लिहावे याबाबत जेव्हा चर्चा झाली तेव्हा असे सुचवण्यात आले की "आम्ही, भारताचे लोक" असे शब्दांकन करून भारतीय नागरिकांना कायद्या समोर समान न्याय व अधिकार देण्याचे आश्वासन खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाने दिले असून न्यायालय पीडित व्यक्तीला सहकार्य करून त्यांची बाजू शासनाच्या बाजूने मांडण्यास मदत करते अशी माहिती दिली. तदनंतर भारतीय संविधान ३९ क नुसार समान न्याय व कायदे विषयक साहाय्य अंतर्गत मोफत विधी सेवा मिळण्याकरिता पात्र हक्कदार व्यक्ती जसे महिला व १८ वर्षाखालील मुले, एसटी व एससी प्रवर्गातील, विविध आपत्ती पीडित, तुरुंगातील, शोषित, औद्योगिक कामगार, मानसिक दुर्बल किंवा दिव्यांग तसेच ३ लाखापेक्षा कमी उत्पन्न व्यक्ती पात्र असल्याबाबत पथनाट्यातून सादर केले तसेच मदतीचे प्रकार जसे विनामूल्य कायदेशीर सल्ला, वकिलाचे प्रतिनिधित्व, लेखन व प्रासंगिक आणि अनुवादाचा खर्च व कायदेशीर कागतपत्रांच्या प्रमाणित प्रति मिळवण्यास मदत कशी मिळते याबाबत पथनाट्याद्वारे सादर करण्यात आले. तसेच पोट कलम 1 या कायद्यास आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम, २००७ नुसार मिळणारी कायदेविषयक मदतीबाबत सुद्धा जनजागृती करण्यात आली.








सदर छोटेखानी कार्यक्रमाचे संचालन श्री. विशाल तायडे यांनी केलेत तर आभार प्रा. डॉ. युगंधरा गुल्हाने यांनी केले. या पथ नाटकाच्या तयारीकरिता न्यायाधीश श्री. नदाफ साहेब, प्राचार्य डॉ राजेंद्र रामटेके, प्रा. डॉ. मंगेश अडगोकर, कार्यक्रम अधिकारी, प्रा. डॉ. प्रफुल्ल चौधरी, सहकार्यक्रम अधिकारी, प्रा. डॉ. युगंधरा गुल्हाने, महिला कार्यक्रम अधिकारी व प्रा. डॉ. अतुल सरोदे यांनी सहकार्य केलेत तर स्वयंसेवक श्रद्धा निंभोरकर, श्रेयस बर्वे, श्रेया कथिलकर, मोहिनी उमाळे, प्राचिका तायडे, समीक्षा चर्जन, समीक्षा चोपडे, तनुजा मनगटे, अपूर्वा लवणकर श्रुतिका कलाने, पायल फसाले, प्रतीक्षा बोदुले, अंकिता दामोधरे, प्राची पवार, स्वाती तायडे, अक्षरा गायकी, समीक्षा भांडे, श्रुती भुसारी, स्वराज धुमाळे, जयकुमार निंभोरकर, अविनाश बनसोड, आदित्य सोनार, आकांशा दरवाई यांनी पाठनाटय सादर केले.  या पथनाट्य करिता रासेयोचे श्री. हर्शल ओकटे, ओम भाविक, निखिल पांडे, यश इंगळे,  गायत्री भोरगडे, मोहिनी उमाळे, श्रावणी दामेधर, सार्थक राऊत व अनेक स्वयंसेवक, तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालयतील सर्व कर्मचारी, चांदूर बाजार पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी आणि बहुसंख्य नागरिकांनी आवर्जून या सादरीकरणाला उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

टोम्पे महाविद्यालयात रासेयो व इतिहास विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

टोम्पे महाविद्यालयात रासेयो तर्फे संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी

रासेयो तर्फे टोम्पे महाविद्यालयात लसीकरण शिबीर