टोम्पे महाविद्यालयात रासेयो व इतिहास विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

 शिवाजी महाराजांच्या आदर्श विचार, नियोजन, बांधणी, दूरदृष्टी, कर्तव्यनिष्ठता, करारीपणा, धाडसी वृत्ती आणि जाती व धर्मांचे एकत्रीकरण आज समाजाला गरजेची - डॉ संतोष बनसोड

स्थानिक गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १९ फेब्रुवारी ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य व्याख्यान आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख व्याख्याता डॉ. संतोषजी बनसोड, अध्यक्ष, इतिहास अभ्यास मंडळ, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती व प्राध्यापक, नारायणराव राणा महाविद्यालय, बडनेरा यांनी "रयतेचा राजा – शिवछत्रपती" या विषयावर महाविद्यालयातील विदयार्थ्यांना मार्गदर्शन केलेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. राजेंद्रजी रामटेके होते तर डॉ. संजय कोठारी, क्षेत्रीय समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना, डॉ. प्रशांत सातपुते, माजी रासेयो कार्यक्रम अधिकारी व सदस्य, सल्लागार समिती व राज्यशास्त्र विभाग प्रमुख तसेच डॉ. प्रियदर्शनी देशमुख, माजी रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी व समन्वयक, स्वामी विवेकानंद स्टडीज सेंटर हे प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमास सहभागी होते.

डॉ. संतोष बनसोड यांनी आपल्या व्याख्यानात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या बालपणापासून केलेल्या शोर्याची गाथा सांगत राजमाता जिजाऊ यांनी शिवबाला घडवतांनाचे अनेक प्रसंग डोळ्यासमोर उभे केले. छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य उभारताना गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी कशा लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण कसे केले याचे सहचित्र वर्णन केलेत. पुढे बोलतांना ते म्हणाले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती यांच्या आदर्श स्वभावातील सहिष्णुता, विचार, नियोजन, दूरदृष्टी, कर्तव्यनिष्ठता, करारीपणा, माणसे ओळखण्याचे कसब  व धाडसी वृत्ती अशी अनेक वैशिष्ट्ये शिवाजी महाराजांची सांगता येतील ज्याचा अभ्यास आज अनेक विद्वान, तत्त्वज्ञ, इतिहासकार करत आहेत. महाराजांचा लढा, संघर्ष, आदर्श राज्य संकल्पना आणि त्यांनी बांधलेल्या किल्याचा तसेच विविध जातीच्या, धर्माच्या व पंथाच्या लोकांना एकत्र जोडण्याचे काम असो की त्यांचे पायदळातील, घोडदळ, किल्ला बांधणीचे, किल्ला संरक्षणाचे कार्य असे विविध कार्य महाराज विविध जातीच्या लोकांना सहज कुठलाही भेटभाव न करता द्यायचे. या सर्व विषयावर आज संशोधनाची गरज असून अनेक विद्यापीठातील अभ्यासक व संशोधक आज जगभरात विविध पहलूंचा अभ्यास करत आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांची रयतेकरिता केलेल्या कामाचा आढावा घेत महाराजांनी गोरगरिबावरील व स्त्रियांवर होत असलेले अत्याचार थांबून अपराध्याला कठोर शिक्षा देण्याचे प्रावधान केले तसेच जनतेची रक्षा व हितासोबत निसर्गाचेही रक्षण व्हावे याकरिता आदेश काढले असे महत्वातचे उदगार काढले.

    सदर कार्यक्रमास डॉ. संजय वाघ, मुंबई विद्यापीठ, डॉ. गजानन सोडणार, सिद्धार्थ जाधव,, डॉ. संजय शेजव, डॉ. चंद्रशेखर कोळीगुडे, डॉ. चंद्रशेखर कोरे, डॉ. अर्चना टाक, डॉ. दीपक तेलंग, डॉ. संतोष यावले, डॉ. पूर्णिमा बनसोड, डॉ. विराज बनसोड. डॉ. सिंधू लोणकर, डॉ. विलास बनसोड, कांतेश्वर ढोबळे, डॉ. किशोर वानखडे, डॉ. शरद देवणगान, छत्तीसगड, डॉ. शिवाजी कांबळे,  डॉ चंद्रकांत चव्हाण, डॉ. किशोर वानखडे, डॉ.वासुदेव डोंगरदिवे, डॉ. जाकिर पठाण विशेष उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. निधी दीक्षित महिला कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना यांनी केले  व  पाहुण्यांचा परिचय प्रा. ज्ञानेश्वर वारंगे व प्रास्ताविक डॉ. मंगेश अडगोकर, कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना यांनी उत्कृष्ठरित्या दिला तर कार्यक्रमाच्या पाहुण्यांचे, सर्व प्राध्यापकांचे व विदयार्थ्यांचे आभार डॉ. प्रफुल्ल चौधरी सहकार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना यांनी केले. या कार्यक्रमास संपूर्ण महाराष्ट्रातून विविध महाविद्यालयाचे प्राद्यापक, बहुसंख्य विदयार्थी, स्वयंसेवक सोबतच डॉ. सुभाष शिरसाठ, डॉ. धनंजय बिजवे, डॉ. उमेश कनेरकर, डॉ. सचिन भोम्बे, डॉ. राम नवसाळकर, प्रा. प्रशांत यावले, प्रा. मंजुषा पवार, डॉ. अतुल सरोदे प्रामुख्याने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

टोम्पे महाविद्यालयात रासेयो तर्फे संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी

रासेयो तर्फे टोम्पे महाविद्यालयात लसीकरण शिबीर