Posts

Showing posts from April, 2022
Image
  टोम्पे व राणा महाविद्यालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्य व्याख्यान संपन्न भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका मानवी मुक्तीचा सरनामा : प्रा. डॉ. पी.एच.सूर्यवंशी स्थानिक: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती संलग्नित गो.सी.टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चांदूर बाजार व नारायणराव राणा महाविद्यालय, बडनेरा येथील   राष्ट्रीय   सेवा   योजना पथकाच्या संयुक्त विद्यमाने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्वावर १४ एप्रिलला राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. डॉ. पी. एच.सूर्यवंशी यांचे “भारतीय संविधान व मानवी मूल्य” या विषयावर आभासी पद्धतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गोपाल वैराळे, नारायणराव राणा महाविद्यालय, बडनेरा तर प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके, गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चांदूर बाजार प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून दोन्ही महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ता...