गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आयक्युएसी अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती : महिला शिक्षण दिन
महिलांनी परंपरा व रूढींना न जुमानता सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन आपला शैक्षणिक व सामाजिक विकास करावा - डॉ. संध्या चर्जन महिला शिक्षण दिनानिमित्य बोलत होत्या स्थानिक गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आयक्युएसी अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती : महिला शिक्षण दिनानिमित्य ३ जानेवारीला व्याख्यान आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. संध्या चर्जन (अंबाडकर) सहाय्यक प्राध्यापक, राज्यशात्र विभाग जगदंब महाविद्यालय, अचलपूर “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन व कार्य” या विषयावर आमच्या महाविद्यालयातील विदयार्थ्यांना मार्गदर्शन केलेत. प्रमुख वक्त्या डॉ. चर्जन यांनी आपल्या व्याख्यानात क्रातिज्योती सावित्रीबाई फुले ह्यांनी सुध्दा एक ध्येय ठेऊन इतिहासातील कर्तृत्ववान स्त्रियांप्रमाणे आपल्या पतीच्या प्रत्येक कार्यात मदत करून आदर्श निर्माण केलात. समाजात थोर समाजसेवक झालेत मात्र अशी पतीपत्नींनी जोडी फार कमी पाहायला मिळते की ज्यांचे कार्य तुल्य...