राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त व्याख्यान संपन्न
रासेयो डेंगूच्या विरोधात जनजागृती मोहीम राबविणार गाडगे बाबाची दससुत्रीतील एक तरी सूत्राचा आपल्या जीवनात आदर्श मानून काम करावे: प्रा. डॉ. प्रशांत सातपुते विद्यार्थ्याने रासेयोमध्ये योध्या सारखे काम करत आपले छंद जोपासावे : प्रा. डॉ. प्रियदर्शनी देशमुख रासेयोच्या संस्कारामुळे विदयार्थी आपल्या व्यक्तीमत्वात बदल करत सामाजिक जबाबदारीची नेहमी जाण ठेवतो. : प्रा. डॉ. श्रीकृष्ण उबरहंडे स्थानिक गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चांदूर बाजारच्या रा सेयो विभाग द्वारे २४ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिना साजरा करत रासेयो स्वयंसेवक आणि राष्ट्रीय सेवा योजना या विषयावर व्याख्यान आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके तर प्रमुख वक्ते व मार्गदर्शक प्रा. डॉ. प्रशांत सातपुते, प्रा. डॉ. प्रियदर्शनी देशमुख, प्रा. डॉ. श्रीकृष्ण उबरहंडे होते. या प्रसंगी रासेयो द्वारा सतत वाढत जाणाऱ्या डेंगूच्या विरोधात जनजागृती करण्याकरिता फाईट द बाईट हे ब्रीद वाक्य सोबत पोस्टरचे विमोचन करत पुढील ए...