राष्ट्रीय सेवा योजना व तालुका विधी सेवा समिती द्वारे पटनाटयातून कायदेविषयक जनजागृती
राष्ट्रीय सेवा योजना व तालुका विधी सेवा समिती द्वारे पटनाटयातून कायदेविषयक जनजागृती पिडीत व्यक्तीला कायद्याने दिलेल्या मोफत सहाय्यताबाबत सामान्य नागरिकांना पथनाटयातून जनजागृती करणे गरजेचे : न्यायाधीश श्री. नदाफ स्थानिक: गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चांदूर बाजार येथील राष्ट्रीय सेवा योजना व तालुका विधी सेवा समिती चांदूरबाजार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पॅन इंडिया अवेअरनेस अँड आउटरिच प्रोग्राम अंतर्गत सर्व सामान्य नागरिकांना भारतीय साविधानाद्वारे दिलेले समान न्याय व कायद्याचे अधिकार माहित व्हावेत. तसेच समाजातील वाईट प्रथा, हिंसाचार, जातीय हिंसा व अत्याचार आणि महिला विरोधी अत्याचार कमी व्हावा याकरिता पिडीत व्यक्तीस समान न्याय व कायदेविषयक मोफत सहायता मिळत असून भारतीय संविधान ३९ क नुसार पथनाट्या द्वारे टोम्पे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनाच्या स्वयंसेवकांनी न्यायाधीश श्री. जी. एम नदाफ साहेब, न्यायाधीश श्री. जी बी. नंदागवळे साहेब, न्यायाधीश श्रीमती डी. के. साहू मॅडम यांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक श्री. नरेंद्र पेनदोर साहे...