टोम्पे महाविद्यालयात  तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र परिषद ( रमन 2022)  उत्साहात संपन्न

 या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये विविध स्तरावरील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक, संशोधक व प्राध्यापकांनी भौतिकशास्त्राच्या संशोधनावर केले विचारमंथन

ग्रामीण विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण मिळण्याकरिता श्रेयांक प्रणाली हाच उत्तम  पर्याय : डॉ दिलीप मालखेडे

चांदूरबाजार :  स्थानिक गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डिएसटी-एसईआरबी व्दारा प्रायोजित भौतिकशास्त्र विभाग व आयक्यूएसी, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने १२, १३ व १४ मे ला तीन दिवसीय व्दितीय आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. रिसेंट ॲडव्हान्स इन मटेरियल सायन्स अँड नॅनोटेक्नॉलॉजी [रमण-2022] या महत्वपूर्ण विषयावर आधारित ही परिषद उत्साहात संपन्न झाली. या दिमाखदार परिषदेची सुरुवात  कु. कृष्णाई धनंजय बिजवे हिच्या गणेश वंदनाच्या नृत्याने झाली.

सदर परिषदेचे उदघाटक डॉ. दिलीप मालखेडे, कुलगूरु, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांनी कार्यक्रमाचे रीतसर  उदघाटन करून याप्रसंगी म्हणाले की, ग्रामीण महाविद्यालयात सुद्धा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त सुविधा संस्थेने उपलब्ध करून दिल्या हे अभिमानास्पद असून या उपयुक्त सुविधांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे.  प्रमुख अतिथी मा. डॉ. एस. एस. यावले, संचालक, शासकीय प्रीआयएएस ट्रैनिंग सेंटर, अमरावती यांनी भौतिकशास्त्र विषय मानवी जीवनाशी कसा निगडित आहे हे सविस्तर स्पष्ट केले. डॉ. एफ. सी. रघुवंशी, माजी अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांनी महाविद्यालयाने  ग्रामीण स्तरावर आंतरराष्ट्रीय  परिषदेचे आयोजन केल्याबाबत  आयोजकाचे कौतुक करून म्हणाले, नविन संशोधकांमध्ये उत्तम क्षमता आहे परंतु त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याची भावना व्यक्त केली आणि हे मार्गदर्शन त्यांना अशा परिषदे द्वारे मिळू शकते असे मत व्यक्त केले. प्रा. डॉ. संदीप वाघोळे, आयक्यूएसी सहसमन्वयक, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांनी सदर परिषद विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्याबाबत आभार व्यक्त करत  संशोधकांना संशोधनाकरिता चालना व मार्गदर्शन देण्याचे काम ही परिषद करेल यात कोणतीही शंका नसल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. भास्करदादा टोम्पे यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांना उत्कृष्ट व गुणात्मक शिक्षण देण्याचा संस्थेचा पूर्वीपासूनच  मानस असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी परिषदेमध्ये मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. निधी दीक्षित व प्रा. डॉ. युगंधरा गुल्हाणे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. प्रिया देवळे, प्रास्ताविक प्रा. डॉ. धनंजय बिजवे यांनी केले. प्रा. मंजुषा पवार यांनी आभार मानले.

            प्रथम सत्राचे प्रमुख वक्ता डॉ. व्ही. नटराजन, माजी विभाग प्रमुख, स्पेक्टोस्कोपी विभाग, बीएआरसी, मूंबई यांनी रमण स्पेसिट्रोस्कोपीचा साहित्य विज्ञान क्षेत्रातील अविष्काराबाबत अभ्यासपूर्ण, संशोधनात्मक विवेचन मांडत भविष्यातील संशोधन कशा प्रकारे उपयुक्त ठरेल याबाबत विशलेषण केले तर व्दितीय वक्ता प्रो. व्लादीमीर व्ही. पेट्रोव, भौतिकशास्त्र विभाग, सारटोव्ह राज्य विद्यापीठ, रशिया यांनी होलोग्राफीक अकोस्टिक  डिसप्ले या विषयावर बोलतांना रशियामध्ये ऑटोस्टेरिओस्कोक स्पेक्टकल्स थ्रीडी  डिसप्ले बाबत एरोसिस्टिमचा आधुनिक उपयोग कसा केला जात आहे. भविष्यात अनेक नवनवीनसंशोधन करण्याची संधी सदर विषयात असल्याचे मत आपल्या संशोधन लेखात ऑनलाईन सादर केले आणि डॉ. एस. जे. ढोबले, नागपूर विद्यापीठ यांनी फॉस्फोरसचा अनुप्रयोग कसा होतो यावर आपला संशोधनपर लेख सादर केला.  व्दितीय सत्राचे प्रमुख वक्ता प्रो. डॉ. एस. पी. यावले, संचालक, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालय, अमरावती, यांनी डायएलेक्ट्रिक रेलॅक्सएशन इन कंडक्टिंग पोलीमर्स या विषयावर अभ्यासपूर्ण सादरीकरण केले.            व्दितीय दिवशी प्रथम सत्रात प्रमुख व्याख्याते डॉ. दिगंबर  नादरगी, पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ यांनी ऍडव्हान्स  मटेरियल्स ऐरोआगेलंस, सोल-जेल मेथोडिओलॉजि, कोटिंग व गॅस सेन्सर बाबत विस्तृत संशोधनपर सादरीकरण केले तर डॉ.अभिजीत यादव, विभाग प्रमुख, राजश्री शाहु महाराज, लातूर यांनी सुपरकॅपॅसिटर करिता नॅनोस्ट्रक्चर्ड मेटल ऑक्सिडंट थीन फिल्म अनुप्रयोग कसा होऊ शकतो आणि भविष्यात बॅटरी स्टोअरेज कसा वाढेल याबाबत सादरीकरण केले तसेच डॉ. के. आर. नेमाडे, इंदिराबाई महाविद्यालय, कळंब यांनी भविष्यात स्पिन-फील्ड ट्रान्सिस्टरची उपयुक्तता आपल्या लेखातून मांडली.

            दुसऱ्या दिवशी व्दितीय सत्रात डॉ. लुका पेलिग्रीनो, सीएनआर-एसपीआयएन, जिनिव्हा, इटली यांनी मायक्रोइलेक्ट्रोमेकॅनिकल सिस्टिम विथ ऑक्साईड सादर करतांना सिलिकॉन नॅनोमेकॅनिक्स व ऑक्साईड नॅनोमेकॅनिक्स याबाबत तुलनात्मक संशोधनपर ऑनलाईन सादरीकरण केले. डॉ. के. आर. नेमाडे, इंदिराबाई महाविद्यालय, कळंब यांनी आपले अनेकविध विषयावर मत मांडले तर प्रोफेसर डॉ. जयदीप साळी, विभाग प्रमुख, भौतिकशास्त्र, कवियत्री बहिणाबाई चौधरी नार्थ महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव यांनी फ़ुललेरेन्स बल्क हेटेरोजंक्शन युसिंग मैक्रोमूलक्सीन शेम, मॉडेलिंग, सिम्युलेशन व प्रयोगात्मक अभ्यास या विषयावर आपले संशोधनात्मक विचार व्यक्त करून फॅब्रिकेशन व कॉपरबेस्ड चॉकोजेनाईड सोलर सेल डिव्हाइसेसची उपयुक्तता व टिकाऊपणा याबाबत संशोधनपर पेपर सादर केले.

         अंतिम दिवशी डॉ. संजय एस. लट्ठे, राजे रामराव महाविद्यालय, जत, सांगली यांनी पाणी व ऑइल गळतिकरणाकरिता सॊडस्ट पॉलीस्टरीण बेस्ड पॅलेट व सीआय२ उपयोग यावर आपले संशोधन मांडले तर प्रोफेसर डॉ. देवराज सिंग, संचालक वीर बहादूर सिंग पूर्वांचल विद्यापीठ, जौनपूर यांनी अल्ट्रासॉनिक विश्लेषणद्वारे रेअर अर्थ मटेरिअलची इलॅस्टिक, मेकॅनिकल व थर्मल प्रॉपर्टीजबाबत संशोधनपर उदाहरणासह स्पष्ट केले. तर डॉ. धिरेंद्र कुमार चौधरी, वैज्ञानिक व विभाग प्रमुख, सेन्टर फॉर रिन्यूएबल एनर्जी, वीर बहादूर सिंग पूर्वांचल विद्यापीठ, जौनपूर यांनी पेरोवस्कीट सोलर सेलची डिवाइसच्या कार्यक्षम व स्थिर आणि एकात्मक बांधणीबाबत आपला संशोधनपर लेख सादर केला.

            समारोपीय कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने  प्रोफेसर डॉ. देवराज सिंग, , डॉ. राजेश जयपूरकर,  प्रो.  डॉ. एस, के. ओमनवार, डॉ. विजय पावडे, डॉ. एन. आर. पवार, डॉ. विजय टोम्पे, प्राचार्य डॉ. राजेंद रामटेके,  डॉ. एन. डी. गव्हाळे, डॉ. ए. आर. बनसोड, डॉ. यु. पी. माणिक हे उपस्थित होते. या समारोपीय  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे सचिव मा. श्री. भास्करदादा टोम्पे  यांनी भूषवले. डॉ जयपूरकर यांनी महाविद्यालयाचे कौतुक करत अश्या प्रकारच्या परिषदेच्या आयोजनामुळे नवीन संशोधनाची आदान प्रदान होते आणि  त्यामुळे संशोधकांची संशोधन वृत्ती व क्षमता वाढवण्यास मदत होते  अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी सदर परिषदेतील बेस्ट पोस्टर,  ओरल,  इन्स्पिरेशनल अवॉर्ड आणि  आऊटस्टँडिंग अकॅडेमीक एक्ससिल्लेन्स अवॉर्ड, डॉ आशुतोष राजगुरे यांनी घोषित  केले आणि त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.




            सदर परिषदेमध्ये विविध  राज्यातून जवळपास दोनशे संशोधकांनी रजिस्ट्रेशन केले.परिषदेमध्ये २४ सहभागींनी मौखिक पद्धतीने  आणि १३ संशोधकांनी पोस्टर द्वारे  आपले संशोधन सादर केले. समारोपीय कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ उमेश कनेरकर व प्रा. डॉ श्रीकृष्णा उंबऱहाडे यांनी केले तर आभार प्रा. प्रिया देवळे यांनी व्यक्त केले. परिषदेचा सारांश प्रा. डॉ. धनंजय  बिजवे  यांनी मांडला. सदर परिषदेकरिता प्रा. डॉ. गोपाल ढोकणे, प्रा. डॉ. आर. डी. बरडे, प्रा. डॉ. अनंत वडतकर प्रा. ए. आर. बनसोड प्रा. डॉ. आर. डी. बरडे यांनी सत्र अध्यक्ष म्हणून सहकार्य केले तर  प्रा. डॉ. एन. डी. गव्हाळे, प्रा. डॉ सुमित इंगळे  प्रा. तुषार नाकाडे प्रा. डॉ प्रवीण परिमल, प्रा. डॉ. प्रफ्फुल चौधरी, प्रा डॉ नवसाळकर, प्रा. आरके, प्रा. आजनकर यांनी सूत्रसंचालन व लाइव्ह करण्याकरिता अथक प्रयत्न केले सदर परिषदेच्या यशस्वी योजनेकरिता संस्थेचे सचिव, महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तथा विद्यार्थ्यांनी आपला प्रत्यक्ष सहभाग व सहकार्य नोंदवला.

Comments

Popular posts from this blog

टोम्पे महाविद्यालयात रासेयो तर्फे संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी

टोम्पे महाविद्यालयात रासेयो व इतिहास विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

रासेयो तर्फे टोम्पे महाविद्यालयात लसीकरण शिबीर