टोम्पे महाविद्यालयात रासेयो तर्फे मिशन युवा स्वास्थ अभियानाअंतर्गत कोविड लसीकरण
कोरोना प्रतिबंधिक लसीकरणाची जनजागृती प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे असून महाविद्यालयात येण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्याने लसीकरण करणे आवश्यक : प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके स्थानिक : स्थानिक गो. सी. टोम्पे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३० ऑक्टोंबर २०२१ रोजी महाविद्यालयात विद्यार्थी व पालक यांच्याकरिता कोविड प्रतिबंधक लसीकरणाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सहसंचालक , उच्च शिक्षण यांचे मिशन युवा स्वास्थ २५ ऑक्टोबर ते २ ऑक्टोबर २०२१ अभियानांतर्गत रासेयो , संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने सर्व महाविद्यालयाच्या रासेयोने स्थानिक सार्वजनिक आरोग्य विभागासोबत समन्वय करुन महाविद्यालयातील युवक-युवतीचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्याचे आदेश दिले होते. याला प्रतिसाद म्हणून टोम्पे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनाने आरोग्य विभागाच्या डॉ. शुभ्रांशू गायगोले , समुदाय आरोग्य अधिकारी , श्री अशोक जावरे , श्री अनिल गुडधे , आरोग्यसेवक , सौ दीपा तिखीले , स्ट...