रासेयो व तालुका विधी सेवा समिती द्वारे युवकांना कायदेविषयक मार्गदर्शन
सामाजिक माध्यमामुळे भारतीय तरुण विध्यार्थी भरकटला असून त्याने कुठल्याही गुन्हेगार प्रवृतीला बळी न पडता आपल्या शैक्षणिक विकासाकडे, आपल्या ध्येयाप्रती आणि सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत उज्वल भारत निर्माण करण्यास मदत करावी : न्यायाधीश श्री. लक्ष्मीकांतजी वाडीकर
स्थानिक: गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चांदूर बाजार येथील राष्ट्रीय सेवा योजना व तालुका विधी सेवा समिती चांदूरबाजार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्ष "आझादी का अमृत महोत्सव निमित्य" पॅन इंडिया अवेअरनेस अॅड आउटरिच प्रोग्राम अंतर्गत माननीय न्यायाधीश श्री. लक्ष्मीकांतजी वाडीकर यांचे 'मुलांची कायदेविषयक अधिकार आणि संरक्षण तसेच रॅगिंग विरोधी कायदे व नियम' या विषयावर आभासी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या प्रास्ताविकात प्रा. डॉ मंगेश अडगोकर यांनी कायद्याचे स्वयंस्फुर्तीने पालन करणे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य असून भारतीय संविधानानुसार मिळालेल्या अधिकाराचा वापर करत सर्वांनी कायद्याविषयी जागृत राहण्याकरिता अश्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे मत मांडले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय श्री लक्ष्मीकांतजी वाडीकर यांनी रॅगिंग बाबत देशांमध्ये होत असलेल्या विकृत घटना बाबत चिंता व्यक्त करत महाविद्यालय स्तरावर असलेल्या समित्या व त्याची अंमलबजावणी तसेच नियमावली बाबत सर्वाना जागृत करणे गरजेचे आहे. त्यांनी रॅगिंग व्याख्या व स्वरूप सांगत जर कोणी हा अपराध केल्यास त्याला दोन वर्षाचा कारावास दहा हजार दंड कायद्यानुसार दिला जातो. तसेच मुलांचे कायदेविषयक अधिकार व संरक्षण समजणे फार गरजेचे असून 60 ते 65 टक्के गुन्हेगारी 18 ते 40 वर्षे वयोगटातील असून बाल कामगार असो बालविवाह कायदा किंवा बाललैंगिक अत्याचार तसेच भारतीय संविधाना कलम ३९ नुसार समान न्याय व कायदेविषयक मोफत आहे व ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार, पोलीस स्टेशन मध्ये सामान्य नागरिकाचे अधिकार आणि लोकन्यायालय याबाबत माहिती सांगत विद्यार्थ्याने जागरूक व्हावे यासाठी तालुका विधी सेवा समिती काम करत असल्याचे सांगितले. सामाजिक माध्यमामुळे भारतीय तरुण विध्यार्थी भरकटला असून त्याने कुठल्याही गुन्हेगार प्रवृतीला बळी न पडता आपल्या शैक्षणिक विकासाकडे, आपल्या ध्येयाप्रती आणि सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत उज्वल भारत निर्माण करण्यास मदत करावी असे परखड मत मांडत सर्वांना आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी न्यायाधीश श्री लक्ष्मीकांतजी वाडीकर यांचे आभार व्यक्त केले तर रासेयो कार्यक्रम अधिकारी यांनी घेतलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थी जागृती होतील अशी अशा व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. मंगेश अडगोकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. युगंधरा गुल्हाने यांनी केले कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी, प्राध्यापक, राष्ट्रीय स्वयंसेवक उपस्थित होते तर सदर कार्यक्रम आजचे प्रत्यक्ष युटूब प्रक्षेपण करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रा. डॉ. मंगेश अडगोकर, कार्यक्रम अधिकारी, प्रा. डॉ. प्रफुल्ल चौधरी, सहकार्यक्रम अधिकारी, प्रा. डॉ. युगंधरा गुल्हाने, महिला कार्यक्रम अधिकारी, प्राचार्य प्रशांत देवतळे, प्रा. डॉ. प्रियदर्शनी देशमुख, प्रा. डॉ. अतुल सरोदे, प्रा. डॉ. प्रप्रशांत सातपुते व अनेक विद्यार्थी व रासेयो स्वयंसेवक हर्षल ओकटे यांनी सहकार्य केलेत.
Comments
Post a Comment