Posts

Showing posts from April, 2021

टोम्पे महाविद्यालयात रासेयो तर्फे आजादी का अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत एक दिवशीय व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न

Image
  'रेझान्ग ला'च्या युद्धातील भारतीय सैनिकांच्या असामान्य शौर्यामुळे चिनी सैनिकास माघार घेण्यास भाग पडले: डॉ. पवन मांडवकर स्थानिक गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चांदूर बाजार येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्ष "आझादी का अमृत महोत्सव" या उपक्रमांतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या प्राप्त मार्गदर्शनानुसार देशाच्या ७५ व्या वर्षाचे औचित्य साधून एकदिवसीय विदयापीठस्तरीय आभासी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. राजेशजी   बुरंगे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती तर प्रमुख मार्गदर्शक सुप्रसिध्द साहित्यिक डॉ. पवनजी मांडवकर, प्राचार्य, इंदिरा महाविद्यालय, कळंब, जि. यवतमाळ व प्रमुख उपस्थितीत डॉ. विजयजी टोम्पे, सदस्य, गो. सी. टोम्पे महाविद्यालय सार्वजनिक ट्रस्ट, डॉ. निलेशजी कडू, समन्वयक, अमरावती जिल्हा ग्रामीण, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती व डॉ. संजयजी कोठारी, क्षेत्रीय समन्वयक, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आणि प...