टोम्पे महाविद्यालयात रासेयो तर्फे आजादी का अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत एक दिवशीय व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न

 

'रेझान्ग ला'च्या युद्धातील भारतीय सैनिकांच्या असामान्य शौर्यामुळे चिनी सैनिकास माघार घेण्यास भाग पडले: डॉ. पवन मांडवकर

स्थानिक गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चांदूर बाजार येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्ष "आझादी का अमृत महोत्सव" या उपक्रमांतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या प्राप्त मार्गदर्शनानुसार देशाच्या ७५ व्या वर्षाचे औचित्य साधून एकदिवसीय विदयापीठस्तरीय आभासी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. राजेशजी  बुरंगे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती तर प्रमुख मार्गदर्शक सुप्रसिध्द साहित्यिक डॉ. पवनजी मांडवकर, प्राचार्य, इंदिरा महाविद्यालय, कळंब, जि. यवतमाळ व प्रमुख उपस्थितीत डॉ. विजयजी टोम्पे, सदस्य, गो. सी. टोम्पे महाविद्यालय सार्वजनिक ट्रस्ट, डॉ. निलेशजी कडू, समन्वयक, अमरावती जिल्हा ग्रामीण, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती व डॉ. संजयजी कोठारी, क्षेत्रीय समन्वयक, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आणि प्राचार्य डॉ. राजेंद्रजी रामटेके यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते तर श्री. भास्करदादा टोम्पे, सचिव, गो. सी. टोम्पे महा सार्वजनिक ट्रस्ट प्रामुख्याने आवर्जून उपस्थित होते.

डॉ. मंगेश अडगोकर, कार्यक्रम अधिकारी यांनी आपल्या प्रास्ताविकातून केंद्र शासन निर्देशित  "आजादी का अमृत महोत्सव" या कार्यक्रमाची उद्दिष्टे व प्रासंगिकता विशद केली. या कार्यक्रमाचे उदघाटन प्रा. डॉ. राजेशजी  बुरंगे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या हस्ते झाले. आपल्या उद्घाटनपर मनोगतात त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची सामाजिक उपयुक्तता व बांधिलकी ठेवत कोरोना काळात रासेयो स्वयंसेवकांनी केलेल्या कार्याचा संदर्भ लोकसभेत मा. किरण रिजीजू, खेळ व युवा मंत्री यांनी प्रतिउत्तरात केला असा उल्लेख करत टोम्पे महाविद्यालयाच्या रासेयो विभागा द्वारे आयोजित कार्यक्रमांची स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा केली.

 प्रमुख मार्गदर्शक सुप्रसिध्द साहित्यिक प्राचार्य डॉ. पवनजी मांडवकर यांनी "स्वातंत्र्य चळवळीतील शूर वीर आणि 'रेझांग ला' च्या लढाईतील दुर्लक्षित नायक" या विषयावर मार्गदर्शन करतांना शिवाजी महाराजांपासून मराठ्यांच्या इतिहासाला उजाळा देत भारतीय स्वातंत्रातील योगदान करणाऱ्या तात्या टोपे, महाराणी लक्ष्मीबाई, स्वातंत्रविर सावरकर, भगत सिंग, सुखदेव, राजगुरु, चंद्रशेखर आझाद,  मदनलाल धिंग्रा, रामप्रसाद बिस्मिल, बटुकेश्वर दत्त, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा ज्योतिबा फुले, पंडित मदन मोहन मालवीय, साने गुरुजी, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सरदार पटेल, डॉ बाबासाहेब आंबेडकर, मोतीलाल नेहरू अशा अनेक महान व्यक्तींनी केलेले स्वातंत्रातील योगदान नेहमी स्मरणीय राहील असे मत व्यक्त केले. तसेच स्वातंत्र चळवळीतील शूर वीर व रेझांग लाचा इतिहास मांडत युद्धभूमीवर झालेल्या प्रसंगांना शब्दरूपात सर्व उपस्थितांसमोर चित्रणरुपी थरारक घटना मांडल्यात. १९६२ च्या चीन-भारतीय युद्धात 13 कुमाऊची चार्ली म्हणजेच सी कंपनी रेझांग ला येथे तैनात होती ज्यात एकूण १२० भारतीय सैनिकांनी मेजर शैतानसिंग यांच्या नेतृत्वात जवळपास ४००० चिनी सैनिकास बँकर नष्ट झाले असतांना, गोळ्या संपल्या असतांना, संपर्क तुटला असतांना, वरून आदेश येणे बंद झाले असतांना, सर्व बाजूने घेरले असले तरीही शेवट पर्यंत हाताने लढाई कशी केली व कशा पद्धतीने माघार घेण्यास भाग पाडले याचे प्रत्यक्ष वर्णन त्यांनी केले. १८००० फूट उंचावर आधुनिक दारुगोळा नसतांना, खाण्याकरिता व शरीराला थंडीपासून वाचवण्याकरिता आवश्यक सामग्री नसतांना तसेच सर्वीकडे बर्फाच्छादीत प्रदेशात या शूर भारतपुत्रानी केलेले शौर्य अतुलनीय असून युनेस्कोने जगातील सर्वोत्कृष्ट ८ लढाईत या लढाईचा समावेश केला आहे. या सर्व सैनिकाचा सर्वोच्च सन्मान भारत सरकारने केले असले तरी सर्व सामान्य जनतेला त्यांचा यशोगाधा कदाचित माहित नाही या सर्व प्रसंगाचे फक्त चार सैनिक आजही साक्ष देतात असे मत मांडत शब्दचित्राद्वारे उपस्थितांना अनेक ऐतिहासिक घटनांचे दाखले दिलेत.

आपल्या मनोगतातून डॉ. विजय टोम्पे यांनी या कार्यक्रमाच्या मुख्य वक्ते डॉ. पवन मांडवकर यांनी युद्धपरिस्थितीचे प्रत्यक्ष वर्णन करत अतिशय सुदर मांडणी केल्याबाबत अभिनंदन केले व आभार मानत उत्कृष्ट  नियोजनाचे कौतुक करत रासेयोला भरभरून शुभेच्छा दिल्या. तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अनेक राष्ट्र भक्तांनी दिलेल्या प्राणाच्या आहुतीचा व योगदानचा आढावा घेऊन युवकांनी त्यांचा आदर्श घेत स्वताच्या व देशाच्या प्रगतीमध्ये कार्य केले पाहिजे असे आवाहन केले. प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन तरुणांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना प्रज्वलीत करणे गरजेचे असून आज राष्ट्रभक्तीची कल्पना फार कमी होत असल्याचे दुःख व्यक्त केले. भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्ष "आझादी का अमृत महोत्सव" अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे तरुणाना स्वातंत्रमध्ये सहभागी वीरपुत्रांचे, क्रातिकारकांचे व थोर समाजसेवकांच्या आयुष्याची माहिती मिळेल असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. निधी दीक्षित यांनी उत्कृष्ट केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मंगेश अडगोकर, कार्यक्रम अधिकारी यांनी केले व पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रफुल्ल चौधरी, सहकार्यक्रम अधिकारी यांनी दिला व आभार रासेयो स्वयंसेवक कु. ऋतुजा इंगळे हीने केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील मोठ्या संख्यने आभासी झूम अँपवर सर्व प्राध्यापक वृंद डॉ. वारंगे, डॉ. कनेरकर, डॉ. बिजवे, डॉ. उबरहंडे, डॉ. प्रियदर्शनी देशमुख, डॉ. प्रिया देवळे, प्रा. सारिका बर्वे, डॉ. सातपुते, डॉ. अतुल सरोदे कर्मचारी वृंद, जिल्ह्यातील इतर महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद डॉ कुऱ्हाडे,  डॉ. हेरोड़े, डॉ. पराग तट्टे आणि विदयार्थी, रासेयो पथकातील सर्व स्वयंसेवक व स्वयंसेवीका, हर्षल ओकटे, आयुष रसे, अनुष्का पांडे, गायत्री टेकाडे,, विदयार्थी व नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

टोम्पे महाविद्यालयात रासेयो व इतिहास विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

टोम्पे महाविद्यालयात रासेयो तर्फे संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी

रासेयो तर्फे टोम्पे महाविद्यालयात लसीकरण शिबीर