Posts

Showing posts from November, 2021

गो. सी. टोम्पे महाविद्यालयात सविधान दिनानिमित्य व्याख्यान संपन्न

Image
  सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार सविधानाने प्रत्येकाला दिला: प्रा. डॉ. संदिप काळे स्थानिक गो. सी. टोम्पे महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागांच्या वतीने संविधान दिनाचे झूम अपवर आभासी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके तर प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. संदीप काळे, यशवंत महाविद्यालय सेलू जिल्हा वर्धा आणि प्रमुख अतिथी डॉ. नंदकिशोर गव्हाळे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक रित्या वाचन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी भारतीय सविधान व गतकाळातील परिस्थिती व आजच्या काळातील संविधानाचे महत्त्व विशद केले. प्रमुख वक्ते प्रा. डॉ. संदीप काळे यांनी प्रत्येक नागरिकाला सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार सविधानामूळे मिळाला असून देशाचे मालक सत्ताधारी किंवा पदाधिकारी नसून सर्वसामान्य जनता ही देशाची खरे मालक आहेत. तसेच प्रत्येक नागरिकाला अन्न, ...