टोम्पे महाविद्यालयात रासेयो तर्फे संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी
प्राचार्य डाॅ. राजेंद्र रामटेके आपले विचार मांडताना स्थानिक गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे रासेयोचे आराध्य दैवत संत गाडगे बाबा जयंती निमित्त प्रतिमेस पूजन करुन व रासेयोच्या स्वयंसेवकांकडून परिसरातील साफसफाई करून खऱ्या अर्थाने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डाॅ. प्रशांत सातपूते, डाॅ. अजित भिसे व श्री. नितीन तसरे यांनी आपल्या भाषणात वैराग्यमूर्ती गाडगे बाबा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच प्रा. ज्ञानेश्वर वारंगे यांनी आपल्या भाषणात गाडगे बाबांचे स्वच्छता, सामाजिक न्याय, सुधारणा व गोर गरिबाकरिता बांधलेल्या वसतिगृह, वृद्धाश्रम व शाळा यांचा आढावा घेतला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डाॅ. राजेंद्र रामटेके यांनी दिवस भर हातात खराटा घेऊन गाव साफ करणारे आणि रात्री भजन, किर्तनाच्या माध्यमातून आपल्या सहज सोप्या पण तितक्याच मार्मिक शब्दांनी अज्ञान आणि अंधश्रद्धारूपी घाण माणसाच्या डोक्यातून बाहेर काढणारे उच्च कोटीचा वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे थोर माणवतावादी संत कर्मयोगी गाडगेबाबा यांचे कार्य प्रत्येक मानवाला आदर्शवत आहे प्र...