टोम्पे महाविद्यालयात रासेयो व इतिहास विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
शिवाजी महाराजांच्या आदर्श विचार, नियोजन, बांधणी, दूरदृष्टी, कर्तव्यनिष्ठता, करारीपणा, धाडसी वृत्ती आणि जाती व धर्मांचे एकत्रीकरण आज समाजाला गरजेची - डॉ संतोष बनसोड स्थानिक गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १९ फेब्रुवारी ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य व्याख्यान आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख व्याख्याता डॉ. संतोषजी बनसोड, अध्यक्ष, इतिहास अभ्यास मंडळ, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती व प्राध्यापक, नारायणराव राणा महाविद्यालय, बडनेरा यांनी "रयतेचा राजा – शिवछत्रपती" या विषयावर महाविद्यालयातील विदयार्थ्यांना मार्गदर्शन केलेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. राजेंद्रजी रामटेके होते तर डॉ. संजय कोठारी, क्षेत्रीय समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना, डॉ. प्रशांत सातपुते, माजी रासेयो कार्यक्रम अधिकारी व सदस्य, सल्लागार समिती व राज्यशास्त्र विभाग प्रमुख तसेच डॉ. प्रियदर्शनी देशमुख, माजी रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी व समन्वयक, स्वामी विवेकानंद स्टडीज सेंटर हे प्रम...
Comments
Post a Comment