टोम्पे महाविद्यालयात तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र परिषद ( रमन 2022) उत्साहात संपन्न या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये विविध स्तरावरील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक , संशोधक व प्राध्यापकांनी भौतिकशास्त्राच्या संशोधनावर केले विचारमंथन ग्रामीण विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण मिळण्याकरिता श्रेयांक प्रणाली हाच उत्तम पर्याय : डॉ दिलीप मालखेडे चांदूरबाजार : स्थानिक गो. सी. टोम्पे कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डिएसटी-एसईआरबी व्दारा प्रायोजित भौतिकशास्त्र विभाग व आयक्यूएसी , संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ , अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने १२ , १३ व १४ मे ला तीन दिवसीय व्दितीय आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. रिसेंट ॲडव्हान्स इन मटेरियल सायन्स अँड नॅनोटेक्नॉलॉजी [रमण- 2022] या महत्वपूर्ण विषयावर आधारित ही परिषद उत्साहात संपन्न झाली. या दिमाखदार परिषदेची सुरुवात कु. कृष्णाई धनंजय बिजवे हिच्या गणेश वंदनाच्या नृत्याने झाली. सदर परिषदेचे उदघाटक डॉ. दिलीप मालखेडे , कुलगूरु , संत गाडगे बाबा अमरा...