रासेयोच्या उद्यानाचे डॉ. राजेश जयपूरकर, प्र-कुलगुरूच्या हस्ते वृक्षरोपण करून उदघाटन

टोम्पे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या वृक्षारोपण, संवर्धन आणि जनजागृती अभियान अभिनय उपक्रम असून स्तुत्य आहे: डॉ. राजेश जयपूरकर, प्र-कुलगुरू संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठा, अमरावती

 स्थानिक गो. सी टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकांतर्गत वृक्षरोपण, संवर्धन आणि जनजागृती अभियानास अंतर्गत विविध वृक्षांची तसेच वनऔषधींची लागवड करण्यात येत आहे  त्यातील एक भाग  महाविद्यालय परिसरात राष्ट्रीय सेवा योजना द्वारे उद्यानाची निर्मित करण्यात येत असून यामध्ये दुर्मिळ औषधी वनस्पती आणि विविध शोभिवंत प्लांट्स लावण्याचे नियोजित आहे. या उद्यानाचे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आदरणीय डॉ. राजेशजी जयपूरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून उदघाटन करण्यात आहे.

  वृक्ष लागवड करण्यासोबत त्यांचे संवर्धन आणि सर्वसामान्यापर्यंत जागृती करणे काळाची गरज असून टोम्पे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या वृक्षारोपण, संवर्धन आणि जनजागृती अभियान अभिनय उपक्रम असून स्तुत्य आहे असे प्रतिपादन प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपुरकर यांनी केले.  या प्रसंगी आदरणीय श्री. भास्करदादा टोम्पे, सचिव, गो. सी. टोम्पे सार्वजनिक ट्रस्ट, प्रा. डॉ. विजय  टोम्पे, व्यवस्थापन सदस्य, प्रा. डॉ. सारंगे धोटे, श्री. राजेश पेंडके, प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके, वरिष्ठ प्रा. डॉ. ज्योती चोरे, प्रा. डॉ. पार्वती शिर्के, प्रा. मंजुषा पवार, श्री. शरद नानोटे, श्री हर्षल ओकटे, श्री. शुभम मोहोड, श्री. प्रफुल तायडे, प्रा. डॉ. मंगेश अडगोकर, रासेयो कार्यक्रम अधिकारी, प्रा. डॉ. प्रफुल्ल चौधरी, रासेयो सहकार्यक्रम अधिकारी व प्रा. डॉ.युगंधरा गुल्हाने, महिला रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.


 

Comments

Popular posts from this blog

टोम्पे महाविद्यालयात रासेयो व इतिहास विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

टोम्पे महाविद्यालयात रासेयो तर्फे संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी

रासेयो तर्फे टोम्पे महाविद्यालयात लसीकरण शिबीर