कुरळच्या पुर्णेत टोम्पे महाविद्यालयाच्या रासेयोने राबविले स्वच्छता अभियान

 कुरळच्या पुर्णेत टोम्पे महाविद्यालयाच्या रासेयोने राबविले स्वच्छता अभियान

 स्थानिक गो सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या स्वयंसेवकांनी चांदूर बाजार तालुक्यातील कुरळ पूर्णा नदीकाठावर गणपती विसर्जनानंतर टाकलेल्या निर्माल्य स्वच्छतेचे अभियान राबविण्यात आले. गणेशोत्सवाच्या दहा दिवसाच्या पूजनानंतर त्यामधून निर्माण होणारे पूजनाचे सर्व साहित्य प्लास्टिक थैल्या, हार, फुले, केळीचे पाने, प्लॅस्टिकच्या डेकोरेशन करीता वापरण्यात आलेले सर्व साहित्य नदीत  विसर्जित करतात. ह्या सर्व निर्माल्यामुळे नदीचे पात्र प्रदूषित होवून पर्यावरणाची हानी तर होतेच सोबतच निर्माल्याची दुर्गंधीमुळे नदीकाठी राहणाऱ्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला हानी पोहचविण्याची दाट शक्यता असते. ही बाब लक्षात घेवून टोम्पे महाविद्यालयाच्या रासेयो विभागाचे गणेश विसर्जनापूर्वीच सर्व गणेश मंडळांना आणि घरगुती गणेश स्थापना करणाऱ्या भाविक भक्तांना व्हिडीओ द्वारे पर्यावरण पूरक मातीचे गणपतीच बसवाण्याचे आवाहन केले होते तसेच फुल, बेलपती आणि इतर साहित्यतून गोळा झालेल्या निर्माल्य पासुन खत निर्मित कशी करावी याची प्रक्रिया सांगण्यात आली होती. प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांच्या मार्गदर्शनात तर राष्ट्रीय सेवा योजनांच्या प्रा. डॉ. मंगेश अडगोकर, रासेयो कार्यक्रम अधिकारी, प्रा. डॉ. प्रफुल्ल चौधरी, रासेयो सहकार्यक्रम अधिकारी, प्रा. डॉ. युगंधरा गुल्हाने, महिला रासेयो कार्यक्रम अधिकारी यांच्या नेतृत्वात श्री शुभम तायडे, रासेयो स्वयंसेवक श्री. श्रेयस जोशी, श्री. हर्षल ओकटे, श्री. रोशन सोनोने व निवडक स्वयंसेवकांनी नदीपात्र स्वच्छतेच्या उपक्रमास सहभाग नोंदवून परिसरातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला. याप्रसंगी नदीपात्रात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  


 




Comments

Popular posts from this blog

टोम्पे महाविद्यालयात रासेयो व इतिहास विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

टोम्पे महाविद्यालयात रासेयो तर्फे संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी

रासेयो तर्फे टोम्पे महाविद्यालयात लसीकरण शिबीर