गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आयक्युएसी अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती : महिला शिक्षण दिन
महिलांनी परंपरा व रूढींना न जुमानता सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन आपला शैक्षणिक व सामाजिक विकास करावा - डॉ. संध्या चर्जन महिला शिक्षण दिनानिमित्य बोलत होत्या
स्थानिक गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आयक्युएसी अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती : महिला शिक्षण दिनानिमित्य ३ जानेवारीला व्याख्यान आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. संध्या चर्जन (अंबाडकर) सहाय्यक प्राध्यापक, राज्यशात्र विभाग जगदंब महाविद्यालय, अचलपूर “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन व कार्य” या विषयावर आमच्या महाविद्यालयातील विदयार्थ्यांना मार्गदर्शन केलेत.
प्रमुख वक्त्या डॉ. चर्जन यांनी आपल्या व्याख्यानात क्रातिज्योती सावित्रीबाई फुले ह्यांनी सुध्दा एक ध्येय ठेऊन इतिहासातील कर्तृत्ववान स्त्रियांप्रमाणे आपल्या पतीच्या प्रत्येक कार्यात मदत करून आदर्श निर्माण केलात. समाजात थोर समाजसेवक झालेत मात्र अशी पतीपत्नींनी जोडी फार कमी पाहायला मिळते की ज्यांचे कार्य तुल्यबळ आहे. त्यांनी क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले व क्रातिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनांतील विविध प्रसंग सांगून त्याप्रसंगाची प्रेरणा घेऊन समाजसुधारणेचा विडा या दाम्पत्यांनी घेतला व त्यांचे सामाजिक कार्य अत्यंत महत्वाचे आणि महानतेचे द्योतक आहे. समाजातील वाईट प्रथा व स्त्रीला शिक्षणाची दारे उघडून देण्याचे श्रेय या दोघांच जात असून समाजातील स्त्री पुरुष एकत्र शिक्षण, शालेय आहार, वसतिगृह, विधवा पुनर्स्थापना, केशमुंडन, सती असा अनेक कालबाह्य प्रथा त्यांनी मोडीस काढल्या. त्यामुळे अनिष्ट रुढीला आधुनिक स्त्रीने पाळू नये व समाजातील कुठल्याही क्षेत्रात काम करून आपली छाप पाडवावी असे उदबोधन आपल्या भाषणात केले. डॉ. प्रियदर्शनी देशमुख, समन्वयक, स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्र यांनी आपल्या भाषणात महिला शिक्षण दिनानिमित्र्य क्रातिज्योती सावित्रीबाई फुले मुळेच महिलांचे आज समाजातील स्थान व दर्जा उजवल्याचे वक्तव्य केलेत.
या ऑनलाईन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्त्री शिक्षणाची मूर्तमेढ करण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले असून त्यामुळे आज स्त्री पुरुषासोबत शिक्षण घेऊन समाजातील विविध पदावर काम करू शकतात. तसेच ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले या दोन्ही दाम्पत्यांचे जीवन तळागाळातील समाजाला प्रेरणादायी असून त्यांनी समाज सुधारणे करिता समाजाला आपले जीवन वाहून दिले नसते तर समाजाची आजची परिस्थिती कदाचित बदलली नसती असे प्रतिपादन केले.
सदर कार्यक्रमास डॉ. धनंजय बिजवे, सदस्य, महाविद्यालय विकास समिती, डॉ. प्रियदर्शनी देशमुख, समन्वयक, स्वामी विवेकानंद अध्यासन केंद्र, डॉ. चौधरी, डॉ. कनेरकर, डॉ. भोम्बे, डॉ. दीक्षित कार्यक्रम अधिकारी, डॉ. प्रिया देवळे प्रा. मंजुषा पवार, प्रा. दुमटकर विशेष उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. मंगेश अडगोकर, कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना यांनी केले व पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक डॉ. युगंधरा गुल्हाने, समन्वयक, महिला समिती यांनी उत्कृष्ठरित्या दिला तर कार्यक्रमाच्या पाहुण्यांचे, सर्व प्राध्यापकांचे व विदयार्थ्यांचे आभार कु. निकिता ठाकरे यांनी केले.

Comments
Post a Comment