टोम्पे व राणा महाविद्यालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्य व्याख्यान संपन्न

भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका मानवी मुक्तीचा सरनामा : प्रा. डॉ. पी.एच.सूर्यवंशी

स्थानिक: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती संलग्नित गो.सी.टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चांदूर बाजार व नारायणराव राणा महाविद्यालय, बडनेरा येथील  राष्ट्रीय  सेवा  योजना पथकाच्या संयुक्त विद्यमाने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्वावर १४ एप्रिलला राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. डॉ. पी. एच.सूर्यवंशी यांचे “भारतीय संविधान व मानवी मूल्य” या विषयावर आभासी पद्धतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गोपाल वैराळे, नारायणराव राणा महाविद्यालय, बडनेरा तर प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके, गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चांदूर बाजार प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून दोन्ही महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले.


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. डॉ. मंगेश अडगोकर यांनी पाहुण्यांचा परिचय देत डॉ बाबासाहेब यांचा जीवनपट व त्यांच्या  समाजभिमुख कार्याला उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याता डॉ पी. एच. सूर्यवंशी यांनी आपल्या व्याख्यानात भारतीय संविधान व मानवी मूल्य याविषयावर मार्गदर्शन करतांना भारतीय संविधान निर्मितीची  प्रक्रिया सांगून  संविधानाच्या माध्यमातून सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य कसे स्वीकारले आणि त्यामध्ये मानवी मूल्यांना कसे महत्व आहे याची पाश्वभुमी स्पष्ट केली. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदीय लोकशाही प्रणालीचा स्वीकार करून  भारतामध्ये समरसता निर्माण करत एक व्यक्ती एक मत आणि समान मूल्यावर भर देत भारतीय संविधानास भक्कम बनविण्याचे स्वप्न पूर्ण केले. जात, धर्म व भाषा याच्या पलीकडे जावून सजक व अस्मिता  दर्शक माणूस म्हणून प्रत्येक नागरिकास अधिकार मिळावा असा यामागचा भाव होता. भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका मानवी मुक्तीचा सरनामा असून सर्व भारतीय नागरिकांनी सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य शासन प्रणाली स्वीकारली आहे. संविधानाने भारतीय नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारातील प्रत्येक कलम  मानवी मूल्याचे मूळ असून समताधिष्ठित लोकशाही, समतेचे तत्वज्ञान, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुभाव समाविष्ठ करून भारतीय शासन व्यवस्थेला मजबुती देण्याचे, सामर्थ्यशाली देश निर्माण करण्याचे काम व मजबूत विचारांचा व सन्मानजनक आणि मूल्याधिष्ठित सुसंस्कृत नागरिक निर्माण करण्याचे काम तसेच सामाजिक न्याय व बंधुता निर्माण करण्याचे काम खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाने केले आहे आणि त्याचे संपूर्ण श्रेय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या अथक प्रयत्नांना जाते असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गोपाल वैराळे यांनी भारतीय लोकशाही बळकट करण्याकरिता भारतीय संविधान सर्वोच्च धर्मग्रंथ मानून कायद्याच्या चोकटीत राहून प्रत्येकाने सामाजिक स्वातंत्र्य, न्याय व बंधुतेचे व लोकशाही मूल्यांचे पालन केल्यास भारताचा  सर्वांगीण विकास व प्रगती होईल असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. संगीता भांगडिया, रासेयो, महिला कार्यक्रम अधिकारी यांनी व प्रास्ताविक  प्रा. डॉ. मंगेश अडगोकर, रासेयो, कार्यक्रम अधिकारी यांनी तर प्रा. डॉ. युगंधरा गुल्हाने, रासेयो, महिला कार्यक्रम अधिकारी यांनी आभार प्रदर्शन केले तर कार्यक्रमाची तांत्रिक बाजू भक्कमपणे प्रा डॉ. ओमप्रकाश मुंदे रासेयो, कार्यक्रम अधिकारी यांनी सांभाळली. कार्यक्रमात प्रा. डॉ. प्रफुल्ल चौधरी, रासेयो, सहकार्यक्रम अधिकारी व दोन्ही महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.











Comments

Popular posts from this blog

टोम्पे महाविद्यालयात रासेयो व इतिहास विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

टोम्पे महाविद्यालयात रासेयो तर्फे संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी

रासेयो तर्फे टोम्पे महाविद्यालयात लसीकरण शिबीर