टोम्पे महाविद्यालयात रासेयो व नेहरु युवा केंद्रा व्दारे मतदार दिनानिमित्य विविध स्पर्धा व व्याख्यान

 

मतदारांनी मतदान करतांना  आमिषाला बळी न पडता योग्य उमेदवाराला संधी द्यावी : प्रा. डॉ. प्रशांत सातपुते

स्थानिक: गो.सी. टोम्पे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चांदूर बाजार, राष्ट्रीय सेवा योजना, रेड रिबिन क्लब व नेहरु युवा केंद्र, अमरावती (युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय) यांच्या संयुक्त विद्यमानाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यातआले. तसेच महाविद्यायात प्राचार्य डॉ. राजेद्र रामटेके व प्रा. डॉ. सुभाष सिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व निवडक विद्यार्थांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्यासाठी सामुहिक मतदाता शपथ देण्यात आली. भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापन दिवस निमित्य आनलाईन मतदार कार्यक्रमात प्रा. डॉ. प्रशांत सातपुते, राज्यशास्त्रविभाग प्रमुख यांच "शासन बदलाचा राजमार्ग : मताधिकार" या विषयावर आभासी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु स्नेहल बासुतकर यांनी केले असून त्यांनी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यामागचा निवडणूक आयोगाचा उद्देश तसेच नेहरू युवा केंद्र यानिमित्य आयोजित करत असलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रा. डॉ. प्रशांत सातपुते यांनी भारतीय लोकशाही व इतर राष्ट्रातील लोकशाही यामधील फरक सांगत भारतीय नागरिकांना स्वातंत्र्योत्तर काळात मिळालेले अधिकार अधिक असून मतदाराचे महत्व लोकशाहीत अनन्य साधारण आहे. योग्य उमेदवार निवडतांना मतदारांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता समाजाचे कल्याण करणारे आणि विधिमंडळात प्रश्न लावून धरण्याची क्षमता असलेलेच उमेदवार निवडून द्यावे असे आवाहन केले. मतदाराचे अधिकार लोकशाहीत श्रेष्ठ असून निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवाराबाबत संपूर्ण सत्य माहिती त्यांना सादर करणे गरजेचे असते.  त्यामुळे भारतामध्ये सर्व लोकशाही पद्धतीने निवडून येणारे प्रतिनिधी लोकसभा, विधानसभा, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका व ग्रामपंचायत यांच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात त्यामुळे मतदाराला योग्य उमेदवार निवडीचा अधिकार दर पाच वर्षांनी मिळत असतो. भारतातील मतदान करण्याची टक्केवारी जरी वाढली असली तरीही बरेच मतदाराने मतदानाला पाठ फिरवून सूट्टीचा आनंद घेणे चुकीचे आहे असे प्रखर मत व्यक्त केले.


 

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी लोकशाहीत  मतदार हा अत्यंत महत्वाचा घटक असून घटना समितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या अथक प्रयत्नांनी सर्व घटकातील 18 वर्षाच्या वर असलेल्या नागरिकांना  दिलेल्या अधिकाराचा उपयोग मतदारांनी योग्य उमेदवार निवडण्याकरीता करावा असे मत मांडत मांडले.

या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन प्रा  डॉ. युगंधरा गुल्हाने, महिला कार्यक्रम
अधिकारी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा डॉ प्रफुल चौधरी सहकार्यक्रम आधिकारी यांनी केले. कु. वेष्णवी पोहोकार हिने विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपले मत व्यक्त केले. निबंध स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धेचा निकाल नंतर घोषित केला जाईल. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रा डॉ. मंगेश अडगोकर, रासेयो कार्यक्रम अधिकारी, हर्षल ओकटे, ओम भाविक, तेजस्विनी डोंगरे, आयुष रसे, समिक्षा भांडे व श्रेयस बर्वे आणि रासेयोचे सर्व स्वयंसेवक यांनी अथक प्रयत्न केले.

 

 

 

 


Comments

Popular posts from this blog

टोम्पे महाविद्यालयात रासेयो व इतिहास विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

टोम्पे महाविद्यालयात रासेयो तर्फे संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी

रासेयो तर्फे टोम्पे महाविद्यालयात लसीकरण शिबीर