टोम्पे महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्य आझादीचा अमृत महोत्सवी डॉ. संतोष बनसोड यांचे व्याख्यान संपन्न

 रासेयो तर्फे राष्ट्राप्रती नागरिकांचे कर्तव्य जनजागृती अभियानांतर्गत देशभक्तांना समर्पीत १५०१ मोतीचूर लाडू वाटप

स्थानिक गो. सी. टोम्पे महाविद्यालय चांदुर बाजार येथे भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 75 वा वर्धापन दिनानिमित्य राष्ट्रीय सेवा योजना व शारीरिक शिक्षण विभाग द्वारे भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्ष "आझादी का अमृत महोत्सव" या उपक्रमांतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या प्राप्त मार्गदर्शनानुसार देशाच्या ७५ व्या वर्षाचे औचित्य साधून आझादीचा अमृत महोत्सवी विविध मान्यवरांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानमालेचे आयोजित करण्यात येत आहे. या व्याख्यान मालेचे प्रथम व्याख्याते डॉ. संतोष बनसोड 'भारतीय स्वातंत्र्य लढ्याची ७५ वर्ष' या विषयाच्या व्याख्यान महाविद्यालयात संत नामदेव महाराज सभागृहात कोरोना नियमांचे पालन करून तसेच झूम आणि युट्युबला सुद्धा प्रत्यक्ष प्रक्षेपित करण्यात आलेत. कार्यक्रमाची सुरवात संस्थेचे सचिव भास्करदादा टोम्पे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तदनंतर राष्ट्रगीताने ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी मंचावर व्यवस्थापन उपाध्यक्ष श्री. राजेशजी ढगे आणि प्रा. डॉ. विजय टोम्पे, सेवा निवृत्त श्री. पवन हरणे, बीएसएफ जवान, प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके, प्राचार्य डॉ. संजय शेजव, प्र-प्राचार्य प्रशांत देवतळे विराजमान होते तर महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच शिक्षण महाविद्यालयातील विदयार्थी व प्राध्यापक, रासेयो स्वयंसेवक आणि मोजकेच विदयार्थी महाविद्यालयाच्या प्रांगणात उपस्थित होते तसेच आभासी झूम सभेत व फेसबुक लाईव्ह मध्ये अनेक मान्यवर सहभागी होते.   

यावेळी प्रमुख वक्ते डॉ. संतोष बनसोड यांनी आपल्या भाषणात भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे महत्व विषद करत स्वातंत्र संग्रामात अमरावती जिल्हातील जुनी अमरावती, यावली शाहिद, मोर्शी तसेच महाराष्ट्रातील काही अलिखित देशभक्तांचे कार्य त्यांच्यावरील इंग्रजांनी केलेले अत्याचार मांडताना प्रेक्षकांच्या अंगावर काटे उभे करणारे प्रसंग विशद केले. अशा अनेक देशभक्तांच्या प्राणाच्या आहुतीमुळे आणि त्यांच्या जीवनाच्या त्यागामुळे आज आपण स्वतंत्रता उपभोगतो आहे असे प्रतिपादन करत आजच्या तरुणांनी स्वातंत्र्याचे महत्व समजून त्यांच्या पासून प्रेरणा घ्यावी  असे मत मांडत प्राध्यापक हा समाजाचा आरशा असून त्यांनी आपल्या विदयार्थ्यांना घडवतांना आपली प्रतिमा आणि समाजाप्रती आपले कर्तव्य पार पडावे असा मोल्लाचा सल्ला दिलात.

प्रा. विजय टोम्पे यांनी अमरावती जिल्ह्यातील रिद्धपुर येथील श्री. पवन हरणे जवान यांच्या आठवणींना उजाळा देत प्रत्येकाने या व्याख्यानातून बोध घेत आपले कर्तव्य योग्य पद्धतीने पार पडावे असे मत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात श्री. भास्करदादा टोम्पे यांनी भारताच्या एकता व अखंडतेमध्ये सामर्थ्य असून भारताचे स्वातंत्र्य मिळवतांना आपल्या अमरावती जिल्ह्याचा स्वातंत्र्यातील सहभाग अतिशय विस्तृत पद्धतीने प्रा. डॉ बनसोड यांनी मांडल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. तसेच अशा या दुर्मिळ ऐतिहासिक साहित्याच्या प्रकाशनाकरिता महाविद्यालय नक्कीच मदत करेल अशी ग्वाही या वेळी दिली. पोहचविण्याकरिता प्रत्येक नागरिकाचे देशाप्रती आपल्या आपल्या परीने समभाग व समतुल्य योगदान असणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केलेत. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन प्रा. डॉ. रविकांत कोल्हे यांनी केलेत तर पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. अजित भिसे यांनी मांडलेत तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. मंगेश अडगोकर यांनी केलेत तर ऑनलाईन टेक्निकल टीम मध्ये प्रा. डॉ. उमेश कनेरकर, प्रा. आशुतोष राजगुरे व प्रफुल्ल चौधरी यांनी उत्कृष्ट कार्य केलेत.

भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या आझादीच्या अमृत महोत्सवी सामाजिक बांधिलकी म्हणून आणि राष्ट्राप्रती नागरिकांचे कर्तव्य जनजागृती अभियानांतर्गत देशाच्या अखंडतेला आणि एकात्मतेचा सर्व सामान्य जनतेला संदेश देण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजना द्वारे प्रा. डॉ. मंगेश अडगोकर, कार्यक्रम अधिकारी, प्रा. डॉ. प्रफुल्ल चौधरी, सहकार्यक्रम अधिकारी आणि प्रा. डॉ. युगंधरा गुल्हाने यांच्या नेतृत्वात कोरोना नियमांचे पालन करून देशसेवेत शहीद सैनिक व स्वातंत्र्यात प्राणाची आहुती देणाऱ्या देशभक्तांना समर्पित चांदूर बाजार परिसरातील तहसिल, नगरपरिषद, रुग्णालयातील रुग्णांना आणि पोस्ट ऑफिस समोर, गुलजार पुरा, जमील नगर, इंदिरा नगर, माधान रस्त्यावरील गोर गरिबांना, लहान मुलांना तसेच विसावा वृद्धाश्रम, परतवाडा रोड अशा विविध ठिकाणी १५०१ पौष्टीक मोतीचूर लाडू वाटप करण्यात आले. यामध्ये प्रा. डॉ. मंगेश अडगोकर, प्रा. डॉ. प्रफुल्ल चौधरी, प्राचार्य प्रशांत देवतळे, प्रा. डॉ. युगंधरा गुल्हाने, कु. साजिया इनामदार, कु. समीक्षा गुलक्षे, श्री. बंटी पिहूलकर, श्री. रोशन सावरकर, श्री. सुयोग गोरले, श्री. देशमुख, श्री. मकासरे, श्री. शुभम मोहोड, श्री. प्रफुल तायडे, श्री. हर्षल ओकटे, श्री. ललित नागपुरे यांनी मोतीचूर लाडू वाटण्यास सक्रिय सहभाग घेतलात. यामध्ये कोरोनाच्या नियमांचा विचार करता प्राध्यापक,  स्वयंसेवकांनी आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमास यशस्वी केलेत.
 
 
 

 

  विविध ठिकाणी मोतीचूर लाडू वाटप

 










   




 


Comments

Popular posts from this blog

टोम्पे महाविद्यालयात रासेयो व इतिहास विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

टोम्पे महाविद्यालयात रासेयो तर्फे संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी

रासेयो तर्फे टोम्पे महाविद्यालयात लसीकरण शिबीर